Thursday, 17 May 2018

बालयोगी काशीगिरी मुरडेश्वर संस्थान केळगाव

*बालयोगी काशीगिरी महाराज* मुरडेश्वर संस्थान यांचे आज हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने  दुखद निधन झाले.       

                                              माझी पहिली शाळा *जि.प.प्रा.शा.लोनवाडी* होती .
            बाबांचे गुरू  *सितामाई* या मुळच्या लोनवाडीच्याच होत्या.त्यामुळे बाबांच्या मनात लोनवाडी विषयी आणि लोनवाडीवासियांविषयी विशेष स्नेह होता.
            मी गावातच राहत असल्यामुळे बाबांचा माझ्याशी बराच स्नेह होता. माझ्या घरी सुद्धा त्यांनी मुक्काम केला होता. बदली झाली आणि लोणवाडी सुटली, मात्र बाबांचा स्नेह कायम होता . पंचक्रोशीत योगायोगाने  कुठेही   भेट झाली तर आवर्जून बाबांचे चरणस्पर्श करण्याची संधी मिळायची .तेंव्हा बाबा आस्थेने व मायेने चौकशी करायचे. मुर्डेश्वरमध्ये कधिही गेलो तरी लोनवाडीवासिय म्हणुनच सदैव ओळखायचे.

         आज महाराज अचानक आपल्यातून निघून गेले.सिल्लोड वासियांच्या आध्यात्मिक क्षेत्रात  फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे.आता कोणत्याही लग्नात , वधूवरांना आशिर्वाद देणारा तो मंद आणि  घोगरा  पण तितकाच धिरगंभीर आवाज आपणांस परत ऐकू येणार नाही.........

बाबांच्या चरणी माझी भावपूर्ण श्रद्धांजली💐💐

No comments:

Post a Comment